Search This Blog

Sunday, September 15, 2013

आठवणीत विरलेली एक सायंकाळ.

बरसणारा वेडा  पाऊस ,चिंब भरून येणारे डोळे 
आता सगळे काही शांत शांत होते . 
कारण तू तेथे सावरायला नव्हतीस ना म्हणून. . !  
 तेंव्हा तुझ्या आसण्याने रडण्याला देखील अर्थ होता,
हल्ली तर आठवणींचा गुंता आणखीनच वाढतोय 
अन असंवे पाण्यासारखी वहातात .
 गालावरील ते थेंब तसेच नकळत विरून देखील जातात. . . . . !!
सगळे काही तुझ्या जाण्याने हिरावून नेले आहे. 
सगळ सगळ ते दुरावल आता माझ्या पासून . . 
फक्त माझ्यासाठी  माझ्याकडे  माझे दुख मागे ठेवून . . . 
@ गजानन माने .  १५. ०९. २०१३

No comments:

Post a Comment