Saturday, September 28, 2013

परतून देशील का ती नजर प्रेमात परत पडायला .


ओशाळल्या नजरेला 
परत प्रेमाची आस नको 
तुटलेल्या त्या मनाला 
 परत प्रेमाचा भास नको 
वास तर येतो फुलांचा 
पायदळी तुडवता 
चुरगळलेल्या त्या फुलांना 
परत कसलीच आस  नको 
नाहीच आठवण काढली कुणी तरी
मनातून  दुखाचा ठाहो नको 
सगळ काही संपले तरी 
इतरांना संपवण्याची भाषा नको 
परत परत प्रेमात पडण्याची 
मनाला त्या आता नशा   नको 
@ गजानन माने .  २१. ०९. २०१३


No comments:

Post a Comment

असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!

“असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!” खऱ्या माणसांची नेहमी गळचेपी होते… त्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो. पण गंमत अशी आहे की, अनेकदा आपला ...