Search This Blog

Saturday, June 4, 2011

पाऊस आणि प्रेमाचे समीकरण



(1)
शाळा आणि कॉलेज प्रेमाचे माहेरघर असे मानले जाते आणि हें दोन्ही ज्यावेळी चालू होते त्याच वेळी पावसाची सुरवात असते त्यामुळे आणि त्यामुळेच नवीन भेटी गाठींची देखील याच वेळी सुरवात होते त्या प्रसंगी झालेली बातचीत , भेटीगाठी एकमेकला केलेली मदत ह्या आठवणी आयुष्य भरासाठी मनात घर करून जातात आणि ह्यावेळी कोणी प्रेमात पडत , कुणाला जिवाभावाची मैत्री मिळते तर कुणाची नुसती नजरा नजर होऊन त्या गोड आठवणी बनून आयुष्यभर सोबत करतात. हेच तर पाऊस आणि प्रेमाचे समीकरण असावे कदाचित ...

(2)
धर्तीची आणि पावसाची जिवाभावाची मैत्री असते त्यामुळे तप्त झालेल्या जमिनीला न्हावू घालण्यासाठी पावसाची हि सुरवात असते हा त्यांचा विरह इतका व्याकूळ करणारा असतो की आता जमिनीला भेटायचे आहे ह्या आनंदाने पाऊस देहभान विसरून गर्जना करीत जमिनीकडे धाव घेतो म्हणून पावसाळा सुरु होण्यापूर्वी आकाशात ढगांचे गडगडाटासह तांडव असते. विरहाने व्याकूळ जमीन आकाशाकडे आशेने अगोदरच टकलाऊन बसते. पाऊस बरसतो अगदी देहभान विसरून दोघे एकरूप होतात. धरती तृप्त होते आणि आपला आनंद मृदुगंध रूपाने सगळी सोडते त्याची प्रचीती म्हणून तर जमिनीमधून नवनवीन अंकुर उमलतात एका नवीन जीवनाची सुरवात होते काहींची काही काळासाठी तर काहींची वर्षानुवर्षांसाठी...!!

No comments:

Post a Comment