Search This Blog

Saturday, May 21, 2011

मन माझेमाझ्या जखमा जेव्हा मनातून पुसल्या जातील
अश्रू तेंव्हा माझ्या गालावर मोती होऊन नाचतील
हें विचारू नको कोणी कोणी फसवले होते मला
नाहीतर चेहरे माझ्या जवळचेच काळवंडतील

जिंवतपणीच यातनाने खूप जळलोय मी
मेल्यानंतर तरी तु आता मला जाळू नकोस.
खूप भिजलोय तुझ्या आसवात मी आजवर
आता एकही अश्रू माझ्यासाठी तु ढाळू नकोस.

असावापरी गळलो मी तुझी अशी वाट पाहताना .
तुला मी पहिले कुणा दुसर्याचा सोबत जाताना.
तु मला दिलेली असावे आयुष्यभरची शिदोरी आहे.
तुझी आठवण मला आता असावाशिवाय अधुरी आहे.

प्रेम एक सुंदर भावना आहे
ती हौसेने कधीच होत नाही.
करतो म्हणून कुणावर असे
कधीच प्रेम करता येत नाही.
.......गजानन माने

No comments:

Post a Comment