Search This Blog

Wednesday, May 18, 2011

सोबत तुझी


माझे सोड ग ते झाड पण अजूनतरी तुझीच वाट पाहतय.
स्थिराहून देखील कावरेबावरे होऊन अवतीभवती शोधतंय
ज्याचा सावलीत आपण तासंतास गप्पामध्ये रमायचो.
मनमोकळेपणे हसायचो आणि खोटे खोटेच रडायचो .
त्याच्या छायेत अनेक स्वप्ने आपण मांडली होती
तु मला दिलेली सगळी वचने त्याने ऐकली होती
त्यामुळेच ते दर वसंतात अगदी जोमाने बहरायचे
बहरलेल्या मोहरला ते तुझ्याकडे पाहत सावरायचे
तु गेल्याचे दुख त्याला कदाचित सहन झाले नसावे.
मोहरच काय साधी पालवी देखील त्याला फुटली नाही.
झोपलो ती रात्र मात्र माझ्यासाठी कधीच मिटली नाही.
................गजानन

No comments:

Post a Comment