Search This Blog

Friday, March 25, 2011

दे घुमाके ..................

कधी काळी दादाच्या गिरिनी जिथे सपशेल नांगी टाकली होती.
तेथे धोनीधुरंधरांनी मानउंचावून लाज राखली आहे.
पाकिस्ताननेच ऑस्ट्रोलीयन संघाला अगोदरच पाणी पाजले होते.
मागाहून भारतानेही त्यांच्या छातीवर पाय ठेऊन तसेच खडे चारले होते.
क्रिकेट मध्ये मीपणा मिरवणाऱ्या संघाची आता चांगलीच जिरली आहे.
रडव्या ऑस्ट्रोलीयन संघाची प्यांट मात्र आता हातभर मागे सरली आहे.
एकदा गमावला ज्याच्यामुळे कप तोच झहीर आता माहीर आहे.
येन केन प्रकारेण विजय साकारणारा संघच आता स्पर्धेबाहेर आहे.
सांशकता होती ज्याच्या समावेशाची तो युवी आता संघाचा रवी आहे.
युवराज कडून वारंवार अशीच खेळी आम्हाला आता हवी आहे.
मिशन पाक काबीज करण्या आता टीम इंडिया दक्ष आहे
चारली आहे माती पाकला खूपवेळा इतिहास याला साक्ष आहे.
........................................गजानन,

No comments:

Post a Comment