Search This Blog

Saturday, March 26, 2011

तुझ्या आठवणी

निशब्द बधीर झालो असा आता मी
परत तेच पूर्वीचे शब्द तोंडातून माझा निघतील का ?
शोधता शोधता तुला थकलोय आता मी
न सापडत मला तु असावे ती डोळ्यात अटतील का ?
प्रेम की स्वार्थ होता तुझा मजवर
पडलेली कोडी मला ती आता तरी सुटतील का ?
नाउमेद होता असाच चालतोय मी .
नव विचाराचे अंकुर माझ्या मनात आता फुटतील का ?
झोपलेल्या अनेक भावना माझ्या
सांग सांग आता त्या अश्याच उठतील का ?
मनावर कोरलेल्या तुझ्या त्या आठवणी
विचारतोय तुला सांग आता तरी त्या मिटतील का ?
. ...................................गजानन

No comments:

Post a Comment