Search This Blog

Monday, March 14, 2011

तु


ओली झालेली जखम माझी अशीच मनात अजून घोळत आहे.
आठवणींचे मलम तुझ्या मी त्यावर अलगद आता चोळत आहे.
खरच तुझ्या आठवणींचा माझ्या जखमेला आता वीट आहे.
माहित आहे तिला कारण त्यातच खरे झोंबणारे मीठ आहे .
...........................................गजान

अनंतात विलीन होणाऱ्या मृगजळाला जगण्याची अश्या तूच लावलीस
अंकुर हि फुटले त्याला पण अंकुर फोडणारी तु मात्र शेवटाकडे धावलीस
...........................................गजान
गझल तुझ्या मनातील मला होणे जमले नाही
ओघळणारे अश्रूहि तुझे कधीच असे मी झेलले नाही
आसवात भिजण्याची सवय अशीच माझी आता रुळली आहे.
किती खरी किती खोटी भावना तुझी आता मला कळली आहे.
...........................................गजान

मनात साठलेल्या जखमा मी तुझ्यासमोर केल्या खुल्या
फुंकर घालण्याऐवजी तु परत त्यांना केल्यास ओल्या
ओल्या झालेल्या जखमांना असेच आता मी सांधतो आहे.
कटू आठवणीची मलम पट्टी मी त्यावर आता बांधतो आहे.
..............................................गजानन

No comments:

Post a Comment