Search This Blog

Tuesday, March 22, 2011

तुझ्यामुळे .........

इतके मी कधीच कुणाशी बोलत नसे
बोलायला शिकलो मी तुझ्यामुळे .......
मला कुणाच्या भावनांची फारशी जाणच नसायची.
त्या जाणायला शिकलो मी तुझ्यामुळे ...................
मी कधीच माघार घेत नसे
पण चुकीचं वेळी मी माघार घ्यायला शिकलो तुझ्यामुळे ....................
मी कधी माझी चूक असली तरी चूक मान्य करीत नसे
ती मान्य करायला शिकलो तुझ्यामुळे ..............
कविता मनात होत्या खूप माझ्या
त्या कागदावर उतरवायला शिकलो तुझ्यामुळे .........
इतक्या खोल दुखात कधीच गेलो नव्हतो मी
खोल दुखात बुडालो तुझ्यामुळे .............
आता पर्यंत मला खूपच प्रामाणिक लोक भेटले
तु मात्र मला नात्याचे जंजाळ फेकून फसवलेस.
फसाया शिकलो मी तुझ्यामुळे...............
नेहमी हसत खेळत असणार मी
खूप अस्वस्थ व्हायला शिकलो तुझ्यामुळे
नेहमीच बहार असणारे झाड मी
उन्मळून पडलो मी तुझ्यामुळे .............
मग काय उपयोग झाला सांग तुझा मला
कारण तूच मला उभे केलेस आणि ....
................ उन्मळून पाडलेस देखील तूच

...........................गजानन

No comments:

Post a Comment