"ज्यांच्या उदरात आकार घेत मी या जगात आलो, ज्यांच्या प्रेमातूनच श्वासाला अर्थ मिळाला, ती माझी जन्मदात्री – आई... आणि ज्या भाषेत मी पहिल्यांदा 'आई' म्हणालो, जिच्या अंगाई गीतात , शब्दांत मला उब सापडली, ती माझी मातृभाषा – मराठी… या दोघींच्या ऋणात मी जन्मभर बांधलेलो आहे, कारण त्यांनीच मला जगायला आणि बोलायला शिकवलं… त्यांच्या चरणीच माझा हा छोटासा ब्लॉग, मनापासून समर्पि "आई आणि मातृभाषा – या दोन गोष्टींचं ऋण शब्दांनी फेडता येत नाही… पण हा छोटासा प्रयत्न त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी."
Wednesday, October 16, 2024
हरवलेले एक पान.
सागर आणि ऋतिकाची हि प्रेमकहाणी . . . हरवलेले एक पान . .
सागर एक खाजगी आस्थापनेतील कंपनीत जेमतेम पगारावर नोकरीस असलेला . . आणि ऋतिका हि एक शिक्षक दांपत्याची मुलगी .
संगीत गायन आणि चित्रकला यात विशेष रस असलेली . . .. दूरदेशी असलेल्या ऋतिका आणि सागर यांची नियतीने अशी . . काही भेट घातली कि .
दोघे काही कालावधी साठी एकरूप झाले . . म्हणायला तसे दोघांची प्रत्यक्षात कधीच भेट झाली नव्हती पण . .दोघांची ओळखीचे माध्यम फेसबुक . . .आणि त्यावरील गप्पा गोष्टीतून . . एकमेकांचे विचार जुळले . . . एकमेकांचे मोबाईल नंबर एकमेकास शेहर केले गेले . .
आणि फोनवरील गप्पा गोष्टीतून . . विचारातून हे दोघे एकमेकात इतके गुरफटले कि . . नंतर नंतर तर दो दिल एक जान . . .!
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी हि कहाणीची सुरवात . . . . .ऋतिकाचा आवाजच इतका मधुर . . ती अधून मधून . . सागरला गाणी ऐकवी . . कधी हार्मोनियम वर एखादे सुमधुर संगीत वाजवून दाखवी . . . तिचा आवाज , तिचे बोलणे . . हे सगळे सागर कित्येक दिवस पहात आणि ऐकत होता . . .!
त्यातून सागर तिच्या प्रेमात हळू हळू गुरफटू लागला . . पण तेंव्हा सुरवातीला ऋतिका हि सागरला एक चांगला मित्र मानत होती .आणि काही दिवसांनी न राहून शेवटी एक दिवस सागरने तिच्यापुढे फोनवर आपल्या प्रेमाची कबुली दिली . . असे अचानक सागरचे बोलणे हा एक तर तिच्यासाठी अतिशय अविश्वसनीय असे होते . .
तिला हे ऐकून धक्काच बसला . . . पण त्याचा . . चांगुलपणावर . . विस्वास ठेवून तिने त्याला . . असेच हो म्हंटले . . पण मनापासून नाही . . . तेंव्हा त्यावेळी सागरच्या ह्या विचित्र प्रपोझल ने ऋतिका थोडी शॉकिंगच झाली होती . .
पण पुढे पुढे दोघांचे फोनाफोनी इतकी वाढली कि . . सुरवातील वर वर होय म्हणारी ऋतिका नंतर नंतर सागरच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली कि . . . . एक दिवस आणि एक क्षण पण असा जात नसे कि एकमेकांचे फोनवर बोलणे होत नाही असे कधीच होत नसे . .. हे इतके मनस्वी प्रेम करणारे हे सागर ऋतिका . . हे जणू काही एक दुजेकेलिये . . बनले गेले आहेत कि काय असे . . वाटत . .
आणि चित्रपटातील हिरो हिरोईन एक होऊन चित्रपट संपतो . . पण इथे काही वेगळेच झाले . . . आपल्या आईवडिलांच्या आज्ञेविरोधात नाजाणारी ऋतिका एक दिवस तिच्या आई वडिलांनी पसंद केलेल्या मुला सोबत लग्न करून दूरदेशी निघून गेली . इकडे सागर पण काही दिवस . . तिच्या विरहात अस्वस्थ आणि शांत शांत राहिला पण त्याने ऋतिकाला कधीच दोष दिला नाही . .
त्यानें तर तिला अभिमानाने सांगितले . . . जेंव्हा शेवटचा ऋतिकाचा कॉल आला तेंव्हा हृतिक सागरला म्हणाली . . माझे लग्न ठरले आहे रे . . . . हे सांगताना तिचे अंतःकरण खूपच जड झाले होते . .
पण मी आई वडिलांच्या जो समाजात मान आहे तो नाही दुखावू शकत . . . मला माफ कर . . . हे ती भरल्या डोळ्यांनी आणि जड मनाने हृतिक सागराला फोनवर सांगत होती . तेंव्हा सागर उतरला . . असूदेत ग आपल्या मनाचा आणि सोबतीचा प्रवास हा इथपर्यंतच . . .
पण एक सांगतो जातेस तर निघून जा .सुखी रहा . . आणि देवाकडे माझ्यासाठी एकाच मागणे माग. . .
"भविष्यात कधी माझे लग्न होईल तेंव्हा मला . . पहिले अपत्य मुलगीच होवूदेत . . आणि ते तुझ्यासारखेच असूदेत . ."
जे कि आपल्या आई वडिलांचा समाजात मान राखेल . . जे आईवडिलांची मन कधी खाली जाऊ देणार नाही . . . . आई वडिलांना दुखावून कोणीच सुखी नाही राहू शकत . . ना तू. . . . ना मी .
शेवटी हरवलेले सागरच्या मनातील एक पान . . हरवलेलेच राहील.
इकडे सागर आपल्या संसारात सुखी आणि तिकडे ऋतिकाआपल्या संसारात सुखी . . हल्ली नाही म्हणायला एखादा मॅसेज असतो फोनवर आणि त्यातूनच एक मेकांची ख्याली खुशाली विचारली जाते.
. . . समाप्त . .
कथा काल्पनिक आहे . . .
Subscribe to:
Post Comments (Atom)
सावळेपण
नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...
-
पानिपतनंतर मराठ्यांचे पुनरागमन : खरा इतिहास (१७६१–१७७१) १७६१ साली तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. हा पराभव केवळ लष्करी...
-
मी कधी तुझ्यासमोर काही बोललो नाही, पण मनाने मात्र प्रत्येक भावना ओरडून सांगितली होती. तू त्यातील कदाचित कधीच काही समजली नाहीस, पण मी मात्र ...
No comments:
Post a Comment