काल घरी जाताना बस मध्ये बसलो होतो, काल जरा ऑफिसहून लवकरच निघाल्यामुळे बस सुटायला अजून बराच अवकाश होता. थोड्यावेळाने माझ्याजवळ एक व्यक्ती येवून बसली. तशी ती मझ्या ओळखीची होती आणि दरोज त्याच बसला असायची. म्हत्वाचे म्हणजे ती रोजच पिऊन टाईट असते. आणि मागचे बाकडे त्यांचे बसण्याचे फिक्स अगदी ठरलेले. पण आज स्वारी माज्याजवळ येवून बसली. बसल्या बसल्या मला म्हणाला काय आज लवकर..?? मी म्हंटले हो, काम काही नव्हते म्हणून लवकर निघालो. आणि मी मस्करीमध्ये त्यांना म्हंटले आज काय पेट्रोल जास्तच टाकलेल दिसतंय. का हो का बरे रोज रोज घ्यायची ती. त्या पासून ना कसलाच फायदा फक्त तोटाच तोटा आहे कि, मग कश्याला बरे हा उपद्व्याप करायचा. तशी ती व्यक्ती मला म्हणाली टेन्शन र.. बाबा.. मी म्हंटले कसले टेन्शन..?? तर ती घरातील सगळे टेन्शन सांगू लागली. मी त्यांना मधेच अडवत म्हंटले असो, हे तर सगळ्यांचाच घरात असते कि मग, तर म्हणे त्याच्या घरातील ते टेन्शन खूपच वेगळे आहे .. तसा मला हि त्याचे टेन्शन ऐकण्यात कसलाच रस नव्हता. मी त्याचाकडे तसे दुर्लक्ष करून कानात हेडफोन अडकवून गाणे ऐकण्यात मश्गुल झालो.सांगण्याचे तात्पर्य जर ह्याला टेन्शन मुळे दारू प्यावी लागत असेल तर मग दारू पिल्यानंतर हा का बरे प्रसन्न नसतो. उलट दारू पिल्यानंतर हा खूपच टेन्शन मध्ये आहे असे दाखवतो. कुणाचे काय तर कुणाचे.
"ज्यांच्या उदरात आकार घेत मी या जगात आलो, ज्यांच्या प्रेमातूनच श्वासाला अर्थ मिळाला, ती माझी जन्मदात्री – आई... आणि ज्या भाषेत मी पहिल्यांदा 'आई' म्हणालो, जिच्या अंगाई गीतात , शब्दांत मला उब सापडली, ती माझी मातृभाषा – मराठी… या दोघींच्या ऋणात मी जन्मभर बांधलेलो आहे, कारण त्यांनीच मला जगायला आणि बोलायला शिकवलं… त्यांच्या चरणीच माझा हा छोटासा ब्लॉग, मनापासून समर्पि "आई आणि मातृभाषा – या दोन गोष्टींचं ऋण शब्दांनी फेडता येत नाही… पण हा छोटासा प्रयत्न त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी."
Sunday, December 23, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
सावळेपण
नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...
-
पानिपतनंतर मराठ्यांचे पुनरागमन : खरा इतिहास (१७६१–१७७१) १७६१ साली तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. हा पराभव केवळ लष्करी...
-
मी कधी तुझ्यासमोर काही बोललो नाही, पण मनाने मात्र प्रत्येक भावना ओरडून सांगितली होती. तू त्यातील कदाचित कधीच काही समजली नाहीस, पण मी मात्र ...

No comments:
Post a Comment