Sunday, January 15, 2012

कविता


शब्दाला अलगत असे शब्द भिडले की, झाली कविता.

दुखी दिनिताला पाहून पाझर फुटला की, झाली कविता.

ओसंडणार्या त्या शब्दातून अर्थ उमटला की, झाली कविता.

तुटल्या फुटल्या हृदयातून विरह सांडला की झाली कविता.

हृदयात भाळाळनार्या वेदनेला अर्थ दिला की, झाली कविता.

अचाट अश्या दुखी मनातून वणवा पेटला की,झाली कविता.

वणव्यातही त्या मायाळू ओलावा भेटला की , झाली कविता.

घेतल्या ज्ञानाचा उपयोग दिला जगाला की , झाली कविता.

ज्ञान का मिळवावे याचा अर्थ उमगला की, झाली कविता.

भुकेल्याच्या तोंडी घासातील घास भरवला की, झाली कविता.

आपले दुख बाजूला सारून आनंद वाटला की, झाली कविता.

उसळणारा मनातील क्रोध आपल्या सावरला की, झाली कविता.

लेकरने जन्मदात्यांच्या डोळ्यातील अश्रू टिपले की,झाली कविता.

सात्विक यशाच्या पाठीवर मायेची थाप पडली की, झाली कविता.

ठणठणत्या जखमेवर प्रेमाची फुंकर घातली की, झाली कविता.

जीवन हें जगण्याचा खरा अर्थ समजला की, झाली कविता.

अशा नठेवता कोणतीच मागे जगाचा निरोप घेतला की, झाली कविता.

@गजानन माने.

No comments:

Post a Comment

असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!

“असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!” खऱ्या माणसांची नेहमी गळचेपी होते… त्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो. पण गंमत अशी आहे की, अनेकदा आपला ...