Search This Blog

Saturday, August 20, 2011

जाणे तुझे !!!


मला सांगा सखे एकटी असताना तु
माझी आठवण कधी काढशील का ?
एकांतात असताना अंधार्या खोलीत
माझ्यासाठी दोन अश्रू ढाळशील का ?

का बरे आलीस वाटेला माझ्या
असे मी एकटे एकटे चालताना.
एकटेपणाची भावना माझी
मनोमनी माझ्या मी तोलताना.

तु पाखरू झालीस तेंव्हा
तुझ्यासाठी मी झाड झालो
उडून गेलीस तेंव्हा मात्र
धगधगता पहाड झालो.

वाटते मला हि मनोमनी
तु आत्ता माझीच व्हावीस
तोडून सारी जाच-बंधने
धावत माझ्याकडे यावीस .

मलाही काही मर्यादा आहेत आता
वाटते न सांगता तु समजून घेशील
नकोस घेऊ असा संशय माझ्यावर
आधार मला प्रेमाचा तूच तर देशील
येईल आठवण माझी तेंव्हा
पाहण्यास मला तरशील तु .
आठवणीच्या उमाळ्यांना
सांगा बरे कसे सावरशील तु
?
विरतील अश्रू सरतील आठवणी
मनाला तुझ्या तु सांभाळ ग
जीव रुतालय तुझ्यात माझा
जसे कोरडे पडलेले आभाळ ग॥!!

.................गजानन माने

No comments:

Post a Comment