Search This Blog

Saturday, August 13, 2011

आज मला मुक्ती पाहिजे


मज आज आताच ह्याक्षणी ..!!
ह्या भकासतेतून मुक्ती पाहिजे.
हृदयी भळाळंणार्या जीर्ण जखमांना
फुंकर नघेण्याची आसक्ती पाहिजे.
जखमेतून वाहणारया रक्ताला
जागीच गोठण्याची सक्ती पाहिजे.
ठणका घालणाऱ्या वेदनेतून
आज मला विरक्ती पाहिजे.
गालावरून घसरत्या आसवांना
थोपवण्याची आता गरज आहे.
तुटता बंध , मिटता डोळे
कोरड्या पडतील भावना माझ्या
पुसलेल्या आठवणीना त्या
त्यांना विरक्तीची ओढ पाहिजे
ह्या बेफाम बेमालूम जंजाळातून
आज मला मुक्ती पाहिजे
...........................................गजानन माने

No comments:

Post a Comment