Search This Blog

Wednesday, June 29, 2011

जाणे तुझेसोडून जाण्यासाठी मला तु कारणे शोधू नको
जाण्याचे कारण देखील तु मला कधी सांगू नको.
स्वताच निघून जाईन खूपदूर मी वाटेतून तुझ्या.
जागा तेवढी सांग जेथे आठवणी नसतील तुझ्या.

भावनांचा खेळ तुझा
मला कधीच कळला नाही.
अंतरीचा वारू आपला
कधीच असा जुळला नाही.

मीही असेच कधी कुणावरतरी एकदा निस्वार्थी प्रेम केले होते.
अंतरीचे सूर आमचे काय माहित तिच्यात कुठवर जुळले होते?
न जुळलेल्या त्या सुरांना माझ्या मनाची आंतरिक ओढ होती.
तुझे काही माहित नाही पण आठवण ती मला मात्र गोड होती .

No comments:

Post a Comment