Search This Blog

Thursday, April 7, 2011

तुझी साथ

सोडायचा होता हात असा मधेच तर
पहिल्यांदा सावरायचा तरी कश्याला
जाणारा तोल माझा सोबतीशिवाय तुझ्या
तु असा पहिला आवरायचा तरी कश्याला

सोडताना हात तुझा त्याक्षणी छाती माझी धडधडत होती.
शेवटचीच भेट होती अपुली अशी जाणीव मला होत होती.

नियमित वाहणारी मंजुळ नदी तु
अचानक असे रौद्ररूप का घ्यावेस.
कवेत तुझ्या सगळ्या आठवणी
घेऊन सागरास असे का मिळावेस.
दिलेली वचने तुझी परत तुझी तुला ती घेऊन जा
ओठांवर हसू माझ्या पहिल्यासारखेच ठेऊन जा

प्रेम केल मी तुझ्यावर असेच फसण्यासाठी
आयुष्यात पुन्हा कधीही न हसण्यासाठी
........................................गजानन, [एक मजेशीर जग].

No comments:

Post a Comment