काल बँकेत मी गेलो होतो, त्यावेळी सत्तरीतले एक गृहस्थ भेटले, त्यांची पैसे काडण्याची स्लीप मी भरून दिली. आणि विचारले काय आजोबा पेन्शनचे का पैसे..?? आणि कुठे होता सर्विसला तुम्ही ..? त्यावेळी ते मला सांगू लागले सर्विस कुठली बाळा, मी ड्रायव्हर होतो आणि जी काही पुंजी मी साठवली होती. ती ह्या बँकेत मी जशी जमेल तशी काटकसर करून भरून ठेवली होती आणि आता ती जशी लागल व जशी गरज पडेल तशी इथून काढून नेतो. तेंव्हा मी विचारले मग त्यांना तुम्हाला मुले वैगेरे ?? तेंव्हा ते म्हणाले हो आहेत ना दोघे आहेत आणि चांगले शिकले सावरलेले आणि नोकरदार आहेत. तुला खरे सांगायचे तर खूप कष्ट केले मी मुलांसाठी त्यांना कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही मी. आणि ती कमी पडू नये म्हणून चार चार दिवस गाडीवरून उतरलो नाही मी त्यांना शाळा शिकवली, मोठे केले लग्न करून दिली त्यांना नोकर्या लागल्या तसे ते आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायाकानासोबत आता मजेत आहेत आमच्या कडे त्यांना लक्ष द्यायला आता वेळ कुठला. ती आता आपल्या संसाराला लागली आहेत ना ?? तसा माझा नं आला आणि मी जागेवरून उठलो असो , तरीपण मी काय बोलणार होतो, आणि काय समजूत काडणार त्यांची तेंव्हा.
"ज्यांच्या उदरात आकार घेत मी या जगात आलो, ज्यांच्या प्रेमातूनच श्वासाला अर्थ मिळाला, ती माझी जन्मदात्री – आई... आणि ज्या भाषेत मी पहिल्यांदा 'आई' म्हणालो, जिच्या अंगाई गीतात , शब्दांत मला उब सापडली, ती माझी मातृभाषा – मराठी… या दोघींच्या ऋणात मी जन्मभर बांधलेलो आहे, कारण त्यांनीच मला जगायला आणि बोलायला शिकवलं… त्यांच्या चरणीच माझा हा छोटासा ब्लॉग, मनापासून समर्पि "आई आणि मातृभाषा – या दोन गोष्टींचं ऋण शब्दांनी फेडता येत नाही… पण हा छोटासा प्रयत्न त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी."
Subscribe to:
Post Comments (Atom)
सावळेपण
नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...
-
पानिपतनंतर मराठ्यांचे पुनरागमन : खरा इतिहास (१७६१–१७७१) १७६१ साली तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. हा पराभव केवळ लष्करी...
-
मी कधी तुझ्यासमोर काही बोललो नाही, पण मनाने मात्र प्रत्येक भावना ओरडून सांगितली होती. तू त्यातील कदाचित कधीच काही समजली नाहीस, पण मी मात्र ...

No comments:
Post a Comment