Search This Blog

Friday, October 7, 2011

असेच काही शब्द अपूर्ण ते .....!!!!



-@-
आपले कर्तव्य करीतकरीतच
स्वअस्तित्व आता साधायचे.
मीपण बाजूला सारून अपुले
तयाहृदयी प्रेममहाल बांधायचे.

-@-
कारणाखेरीज मन असे कधीच कुणात गुंतत नाही.
इंद्रधनू उगाच कधीहि सृष्टीत रंग शिंपत नाही.
गुंतणेगुंफणे हा मनाचामनाने घेतलेला वेळ आहे
शिंपणे रंग इंद्रधनूचे हा उन पावसाचा खेळ आहे.

-@-
कारणाखेरीज मन असे कधीच कुणात गुंतत नाही.
इंद्रधनू उगाच कधीहि सृष्टीत रंग शिंपत नाही.
गुंतणेगुंफणे हा मनाचामनाने घेतलेला वेळ आहे
शिंपणे रंग इंद्रधनूचे हा उन पावसाचा खेळ आहे.

-@-
वेड्या त्या खळाळनार्या लाटा
कवेत त्या चंद्राला सामावून घेतात.
निसटता कवेतुन तो विरहात त्याच्या
किनार्यावर मग त्या आहुती देतात।

-@-
प्रेमाला ना व्यास असतो
ना प्रेमाला त्रिज्या आसते.
सामान्याहून निराळे घडेल
अशी मात्र प्रेमात उर्जा आसते.
-@-
असावे आता आवर तुझी ती
समोर
दुखाचे पाट वहाऊ नकोस.
खूपच ऐकल्यात दुखी व्यथा
अजून त्यात दुख सिलगाऊ नकोस.
-@-
कधी कधी शब्दानाही कोडे पडेल
अशी काही जवळ मनसे असतात
विनासायास सहवास लाभतो त्यांचा
तेंव्हा देवाचे ते दूतच भासतात.

-@-
हल्लीचे तुझे असे हे वागणे
काहीच आता मला कळत नाही
मनात तरी काय आहे तुझ्या ??
ह्याचे उतरच आता मला मिळत नाही !!

-@-
आठवणीचे ते नाजुक धागे तुझे
मनामनात अलगद जपलेत मी
काळीज
चिरनार्या आर्त वेदना
अजवारी खुप सोसल्यात मी
जिथे जिथे मी आशेने पाहिले
नैराश्याच माझ्या पादरी पडली.
आठउनिया गतकाळ माझा
मज जगण्याची आशा नउरली

-@-
पाहुनिया माझे आजचे खळखळुन हसने
अनेकांच्या
भुवया अलगद उंचावल्या .
हसण्यामागच्या
निर्जीव भावना तेंव्हा
निराशेच्या कुशीत आज त्या विसावल्या.
दिखाऊपणा दुखाचा करणे जमत नाही
नैराश पोटी ठेवून हसणे आता घडत नाही.
भोगलेले कष्ट सोसलेल्या वेदना येथे चूर झाली
अतूट बंधनांची सीमा माझी आता विधुर झाली.

@गजानन माने.

No comments:

Post a Comment