Search This Blog

Tuesday, September 20, 2011

चार अंतरओळ्यापूर्णपणे होरपळलोय आजवर मी
अजून काय काय जाळणार तु .
करपलेल्या त्या मनाला माझ्या
आठवणीच्या तेलात का तळणार तु।

खोल तुझ्या डोळ्यातील अश्रू सागरात
पूर्वीच खूप खूप मसोक्त डुंबणे झाले.
विरहाच्या गटकाळ्यात आता मला
आयुषभरासाठी आता झुंजणे आले ।
टकमक टकमक डोळ्यांनी तु
अशी आता मला पाहू नकोस.
पाहून इकडे चोरट्या नजरेने
पूर्वीच्या वेदना तु देवू नकोस।
बोलने आता मी सोडले आहे
मनाला तुजया टोचेल असे
शब्दाच शिल्लक नाहीत मजकडे
कदाचित तुला रुचेल असे।
बाकी काय आता शिल्लक राहिली
जेंव्हा जेंव्हा मी मागे वळून पाहिले
मिळालेल्या त्या आनंदी भूकटीवर
तुझ्या विरह आठवणीचे व्रण राहिले।

वाटते मला आता एक मैत्रीण पाहिजे
मनाच्या खूप अगदी जवळ पोहचणारी
ती अशी मनमिळाऊ सामंजस्य सखी पाहिजे
सुखदुखात साथकरेल इतकी तीझ्यात नेकी पाहिजे।

नियमित भिरभिरणारा पतंग मी
मज दिव्याचा ज्योतीची आस आहे
कश्याला कोणी सांगावे कधी शेवट माझा.?
ज्योतीची आस धरणेच हा खरेतर ...!!
माझ्यासठी कायमचा विनाश आहे

@गजानन माने

No comments:

Post a Comment