Search This Blog

Thursday, July 7, 2011

जीवन प्रवाहटीप :- सर्व फोटो बिंगसर्चइंजिनच्या सहकार्याने

Tuesday, July 5, 2011

जगण्याचे रणांगण २


जीवनात प्रत्येक वळनावर कोणी साथसंगत करीलच का हें सांगता येत नाही. पण जर प्रबळ शब्दच आपल्या सोबत असतील तर जीवनातील कोणतेही संकट परतवता येते आणि त्यामधून सहीसलामत तारून जाता येते हेच मी आजपर्यंतच्या जीवन प्रवाहात शिकलो तेच हें शब्दांचे प्रबळ शब्दसमर्थ रणांगण . पण या रणांगणात अनेकान अनेक प्रकारे दिन होउन शेवटी जगण्याची धडपड करावी लागतेच त्याचेच हे सचित्र वर्णन

जगण्याचे रणांगण १


जीवनात प्रत्येक वळनावर कोणी साथसंगत करीलच का हें सांगता येत नाही. पण जर प्रबळ शब्दच आपल्या सोबत असतील तर जीवनातील कोणतेही संकट परतवता येते आणि त्यामधून सहीसलामत तारून जाता येते हेच मी आजपर्यंतच्या जीवन प्रवाहात शिकलो तेच हें शब्दांचे प्रबळ शब्दसमर्थ रणांगण . पण या रणांगणात अनेकान अनेक प्रकारे दिन होउन शेवटी जगण्याची धडपड करावी लागतेच त्याचेच हे सचित्र वर्णन

Saturday, July 2, 2011

विरती वेळ अश्रूंची


वेळ आता सरली आहे
तुझ्या येण्याची पूर्ण अश्या
आता पुरती विरली आहे.
मन वेडे मनाला माझ्या
अनेक कोडी पडलेत
अनेका पैकी एकच कोडे
आता मला सोडवायचे आहे.
बेफिकीर बिनदिकत मनाला
आता खूप खूप रडायचे आहे
ओघळणारे अश्रू माझे आता
असेच मला थोफावयाचे आहे .
दाटणार्या डोळ्यातील उमाळ्यांना
कायमचे आता झोपवायचे आहे.
दाटेल कंठ विरतील अश्रू
विरल्या अश्रुना माझ्या आता.
खोल हृदयात कुठेतरी जपायचे आहे.
आलेले दुख वाट्याला माझ्या
तुझ्या कडे थोडे सोपवायचे आहे.
खूपच अश्रू ढाळलेत मी
आता त्यांना आवरायचे आहे.
शोधण्यासाठी जगण्याच मार्ग
आता माझे मलाच सावरायचे आहे.
...................................गजानन

Friday, July 1, 2011

शाळेतल्या कांही गंमती जमंती

@1@
मी आठवीला होतो आमचा मागचा बेंच हि आमची ठरलेली बसनेची जागा असायची. त्यामुळे प्रत्येक वेळी जेंव्हा जेंव्हा सर किंवा बाई यांनी एखादा प्रश्न विचारला की समोरचे हुस्सार आणि मागचे टवाळखोर हें ठरलेले गणित त्यामुळे पहिल्यांदा उत्तताराची अपेक्ष्या आमच्या कडूनच आमच्या गुरुजनांना असायची. त्यामुळे उत्तर येओ अगर ना येओ हात वर करायचाच.
आणि सर मी सांगतो मी सांगतो असे उगाचच बरलायाचे . आणि तसे नाही केले तर हमखास उत्तर आम्हालाच द्यायला लागायचे . जे हात वरती करतात त्यांना उत्तर येते असे गृहीत धरून आमचे गुरुजन आम्हाला कधी उत्तर देण्यासाठी उठवत नसत हा एक फायदा असायचा.
असेच एकदा आमच्या सरांनी माझ्या जवळ बसलेल्या मुलाला विचारले सांगरे पाळीव प्राणी कोणते आणि झाले नेमके वेगळेच त्याला काय ऐकू गेले कुणास ठाऊक तो उठला आणि कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहू लागला. सर परत म्हणाले , पाळीव प्राणी सांग कोणते ते सांग . ते त्याला परत काहीच समजले नाही आणि तो माझ्याकडे मला उत्तर येते का या आशेने पाहू लागला. आणि त्याच वेळी माझ्या मनात त्याची खिल्ली उडवावी या हेतूने मी त्याला भलतेच कहीतरी उत्तर सांगितले. आणि मी त्याला सांगितले की सांग वाघ, सिंह, हत्ती वैगेरे तो जेंव्हा हें सांगू लागला तर सर जाग्यावरून उडालेच. आणि त्याला थांबवत म्हणाले काय रे लेका हें सगळे तुमच्या घरी आहेत का ? बस शहाणा आहेस. आणि सारा वर्ग हस्स सागरात बुडाला.
नन्तर त्याला माझा राग आला आणि तो मला म्हणाला काय रे अस का रे सांगितलेस त्यावर मी त्याला म्हणालो की अरे वाघ सिंह हें सर्कशीत नसतात का ते काय पाळल्या खेरीज स्वताहून सर्कशीत येतात का ? ते पाळलेलेच असतात की, हें काय सरांना माहित नाही का? त्याला देखील ते पटले आणि मी वेळ मारून नेली.
@2@
वर्गात काहीतरी मस्ती केली , किंवा गृहपाठ नाही केला तसेच वर्गात इनशर्ट केला नाहीतर वर्गातून बाहेर जावे लागायचे. आणि मला इनशर्ट करायला कधीच आवडत नसे. त्यामुळे जे ठराविक सर आहेत ते वर्गात तास घेण्यास आले की समोरून तेवढी शर्टची घडी घालायची आणि इनशर्ट केल्याप्रमाणे सरांना दिसावे या पद्धतीने बसायचे हें आमचे ठरलेले. त्यामुळे वर्गाबाहेर पडण्याची अपत माझ्यावर शक्यतो कधी येत नसे एकवेळ असे झाले की सरांच्या मनात काय आले कुणास ठाऊक सर वर्गात आले ते तडक माझ्यापाशीच आणि त्यांनी मला उभे केले . मी उभा राहिलो तसी शर्टाची घडी निघाली आणि आणि शर्ट सरळ खाली आला. इनशर्ट केला नसल्याचे पाहून सर माझ्यावर भडकलेच . माने इनशर्ट का केला नाहीस का इनशर्ट करायची लाज वाटते का? वैगेरे वैगेरे मला बोलू लागले. आणि त्यांनी सरळ मला वर्गाबाहेरचा रस्ता दाखवला. माझी चूक असल्यामुळे मी एकही शब्द न बोलता वर्गाबाहेर पडलो आणि सरळ वर्गाच्या मागच्या खिडकी पाशी येऊन थांबलो . आणि त्याच वेळी सर हजेरी घेऊ लागले, जेंव्हा माझा नंबर घेतला गेला तेंव्हा मी खिडकीतूनच एस्स सर, अशी आरोळी ठोकली पट थोडा जास्त असल्यामुळे सर भरभर नंबर उच्यारीत आणि नम्बारापुढे हजेरी लावत मी जेंव्हा बाहेरूनच एस्स सर, अशी आरोळी ठोकली तेंव्हा ती सरांनी हजेरी बुकात हजर अशी माझी हजेरी लावली आणि त्यामुळे सारा वर्ग फिदीफिदी हसू लागला पण सरांच्या नेमके काय लक्ष्यात नआल्यामुळे मी वाचलो. आणि दुसर्या दिवसही वर्ग ताट मानेन बसायला तयार कारण एक दिवस जो त्या सरांच्या एका तासाला गैरहजर तर तो वर्षभर गैर हजर हें समीकरण होते त्यामुळे जो कोणी एक दिवस जरी गैर हजर राहिला तर ते त्याला नेहमीच वर्गाबाहेर कडत. असे बरेच माझे मित्र वर्षभर वर्गाबाहेर असायचे त्या सरांच्या तासाला. आणि महत्वाचे म्हणजे ते आमचे मागच्या बेंचवाल्यांचे कोणतेच कारण ऐकून घेण्याचा मनस्थितीत कधीच नसत. ह्या माझ्या चालाखीमुळे माझ्यावर वर्षभर वर्गाबाहेर रहाण्याची अपत आली नाही.