Wednesday, April 20, 2011

जीव दंगला गुंगला रंगला असा..

अशी काही गाणी निर्माण होतात की जी ऐकल्यानंतर ती थेट काळजाला जाऊन भिडतात असेच हें एक थेट काळजाला हात घालणार मराठी गाण "जीव दंगला गुंगला रंगला असा" मला खूप भावले आहे तुम्हालाही नक्कीच भावेल ..............

जीव दंगला गुंगला रंगला असा..
पीरमाची आस तू ..
जीव लागला लाभला..
ध्यास ह्यो तुझा..
गहिवरला श्वास तू..

पैलतीरा नेशील..
साथ मला देशील..
काळीज माझं तू ..

सुख भरतीला आलं..
नभ धरतीला आलं..
पुनवचा चांद तू..

जीव दंगला गुंगला रंगला असा..
पीरमाची आस तू ..
जीव लागला लाभला..
ध्यास ह्यो तुझा..
गहिवरला श्वास तू..

चांद सुगंधा येईल..
रात उसासा देईल ..
सारी धरती तुझी..
रुजाव्याची माती तू..

खुलं आभाळ ढगाळ..
त्याला रुढीचा ईटाळ..
माझ्या लाख सजणा..
हि काकणाची तोड माळ तू..

खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन..
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचं गोंदण..

जीव दंगला गुंगला रंगला असा..
पीरमाची आस तू ..
जीव लागला लाभला..
ध्यास ह्यो तुझा..
गहिवरला श्वास तू..
.....................चित्रपट :- जोगवा

No comments:

Post a Comment

सावळेपण

नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे, गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे। कानडा तो राजा पंढरीचा, रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे। डोळ्यां...