Search This Blog

Monday, July 2, 2012

खस्ता या कश्यासाठी ??काल बँकेत मी  गेलो होतो, त्यावेळी सत्तरीतले एक गृहस्थ भेटले, त्यांची  पैसे काडण्याची स्लीप मी भरून दिली. आणि विचारले काय आजोबा पेन्शनचे का  पैसे..??  आणि कुठे होता सर्विसला तुम्ही ..? त्यावेळी ते मला सांगू लागले सर्विस कुठली  बाळा, मी ड्रायव्हर होतो आणि जी काही पुंजी मी साठवली होती.  ती ह्या बँकेत मी जशी जमेल तशी काटकसर करून  भरून ठेवली होती आणि आता  ती जशी  लागल व जशी गरज पडेल  तशी इथून काढून नेतो.  तेंव्हा   मी विचारले मग त्यांना तुम्हाला मुले वैगेरे ?? तेंव्हा ते म्हणाले हो आहेत ना दोघे आहेत आणि चांगले शिकले सावरलेले आणि नोकरदार आहेत. तुला  खरे सांगायचे तर खूप कष्ट केले मी मुलांसाठी त्यांना कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही मी.  आणि ती कमी पडू नये म्हणून चार चार दिवस गाडीवरून उतरलो नाही मी  त्यांना शाळा शिकवली, मोठे केले लग्न करून दिली त्यांना नोकर्या लागल्या तसे ते आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायाकानासोबत आता मजेत आहेत आमच्या कडे त्यांना लक्ष द्यायला  आता वेळ कुठला. ती आता आपल्या संसाराला लागली आहेत ना ??  तसा माझा नं आला  आणि मी जागेवरून उठलो असो , तरीपण  मी काय बोलणार होतो,  आणि  काय समजूत काडणार त्यांची तेंव्हा.