Search This Blog

Friday, December 30, 2011

ब्लॉगची वर्षपूर्ती


माझ्या "मला भावलेल्या कविता" हा ब्लॉग एक वर्ष पूर्ण करून दुसर्या वर्ष्यात पदार्पण करतोय त्यानिमित थोडे.....
जानेवारी २०११ ला मी माझा ब्लॉग तयार केला त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. ब्लॉग लेखनाबद्दल तसा मी अनभिज्ञच. पण, काही मित्रांच्या सहकार्यामुळे हें सगळे मूर्त स्वरुपात उतरले हें येथे विशेष नमूद करावेशे वाटते. ह्या माझ्या एक वर्षाच्या प्रवासात अनेकांनी माझी समोर स्तुती केली पण माझ्या मागे माझी खिल्ली देखील उडवली पोरकट लिखाण असा शेरा दिला. हें सगळे करताना त्या माझ्या मित्रांनी मला माझ्या ब्लागवरती स्पष्टपणे तसे अभिप्राय रूपाने सांगितले आसते तर मला अतिशय आनंदच झाला असता. पण त्यांनी तसे नकरता प्रत्यक्ष्यात तोंडावर स्तुती आणि मागे खिल्ली उडवली याचे दुख होत नाही तर आश्चर्य वाटते. कारण त्यांच्या स्वताच्या मतावर कदाचित त्यांचा स्वताचा विश्वास नसावा. असो, ते देखील माझ्यासाठी बहुमुल्यच. असो, पण त्याच बरोबर जे काही माझे जवळचे मित्र व इतर माझे जवळचे नातेवाईक यांनी माझे लिखाण पाहून जे कांही प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी त्यांचे मी आभार अगदी मनापासून मानतो. इतके माझ्या काहीं जवळच्या मित्रांनी मला ब्लॉग वाचून प्रोत्साहन दिले व योग्य असे बद्दल सुचवले. त्यांचा विनंतीला मान देऊन मी योग्य तेथे बद्दल केले त्यांनी दिलेले प्रोत्साहन माझ्यासाठी अतिशय बहुमूल्य होते. आणि इथून पुढे देखील असेच पाठबळ राहील अशी अपेक्ष्या करतो ....!! धन्यवाद गजानन माने .

Thursday, December 22, 2011

साथ तुझी !!

जरी घडी घडी तु मला भिजवत राहिलीस
तरी मी किनार्याप्रमाणे कोरडाच राहिलो
तु मला परतणाऱ्या लाटे प्रमाणे सोबत दिलीस
त्या लाटेसोबत मला तुझ्यात विलीन व्हायचे होते.
प्रेमाने उसळू पहाणार्या तुझ्या त्या हृदयाला
मज हृदयात खोलवर कायमचे सामावयाचे होते.
मनातील गीत बनुनी तुझ्यासवे ते गायचे होते.
भरकटलेल्या गलबताप्रमाणे खोलवर जायचे होते .
आता एक अनामिक हूरहूर मनी तशीच राहुनी गेली
जी पहिली स्वप्ने मी ती किनार्यावरती तशीच विरली
@गजानन माने.