Search This Blog

Sunday, March 17, 2013

परकी असंवे हि ??

वळूनी मागे पहाता आसवानी साथ सोडली
नकळतच त्यांनी मग मातीशी नाळ जोडली
रडणे मग सुखाचे . . आनंद कुठे मी शोधू
बाहूत तुझ्याच त्यांना रुजण्यास आता सांगू
रुजतील . . खिजतील आसवे परकी मज होतील
धुंदीत दुखाच्या ती मग तशीच बरसू पहातील .
होतील परकी तेंव्हा भान कसलेच नसेल यावेळी
परके कसे तरी समजू मग ??. डोळे भरतात वेळी अवेळी . . !!
                                                        @गजानन माने - १७ .०३ .२०१३