Search This Blog

Sunday, December 23, 2012

दारुतली दुधारी


काल घरी जाताना बस मध्ये बसलो होतो, काल जरा  ऑफिसहून  लवकरच निघाल्यामुळे बस सुटायला अजून  बराच अवकाश होता.  थोड्यावेळाने माझ्याजवळ एक व्यक्ती येवून बसली. तशी ती मझ्या ओळखीची होती आणि दरोज त्याच बसला असायची. म्हत्वाचे म्हणजे ती रोजच  पिऊन टाईट असते. आणि मागचे बाकडे त्यांचे बसण्याचे फिक्स अगदी ठरलेले. पण आज स्वारी माज्याजवळ येवून बसली. बसल्या बसल्या मला म्हणाला काय आज लवकर..?? मी म्हंटले हो,  काम काही नव्हते म्हणून लवकर निघालो. आणि मी मस्करीमध्ये  त्यांना  म्हंटले आज काय पेट्रोल  जास्तच टाकलेल दिसतंय. का हो का बरे रोज रोज घ्यायची ती. त्या पासून ना कसलाच फायदा फक्त तोटाच तोटा  आहे कि, मग कश्याला बरे हा उपद्व्याप करायचा. तशी ती व्यक्ती मला म्हणाली टेन्शन र.. बाबा.. मी म्हंटले कसले टेन्शन..?? तर ती घरातील सगळे टेन्शन सांगू लागली. मी त्यांना  मधेच अडवत म्हंटले असो, हे तर सगळ्यांचाच घरात असते कि मग, तर म्हणे त्याच्या घरातील ते टेन्शन खूपच वेगळे आहे .. तसा मला हि त्याचे टेन्शन ऐकण्यात कसलाच रस नव्हता. मी त्याचाकडे तसे दुर्लक्ष करून कानात हेडफोन अडकवून गाणे ऐकण्यात मश्गुल झालो.सांगण्याचे तात्पर्य जर ह्याला टेन्शन मुळे दारू प्यावी लागत असेल तर मग दारू पिल्यानंतर हा का बरे प्रसन्न नसतो. उलट दारू पिल्यानंतर हा खूपच टेन्शन मध्ये आहे असे दाखवतो. कुणाचे काय तर कुणाचे.