Search This Blog

Thursday, February 16, 2012

प्रेम म्हणजे ..प्रेम म्हणजे ..प्रेम...!!

Saturday, February 4, 2012

जीवनमार्गक्रमणआले वाट्याला पुष्कळ दुख तरीही ते सोसून हसावे लागते

चालताना वाटेवर सोबत कुणी नसले तरी चालावे लागते
चालताना रुतले काटे पायात म्हणून मार्ग बदलायचा नाही
आले जरी अपयश पदरात तरी धीर असा सोडायचा नाही
वेदना सहन करतच रक्ताळल्या पायाने मार्गक्रमण करायचे
अपुल्या वाटेतील कोणत्याच संकटाने कधीच नाही हरायचे
यशापयशाची गोळाबेरीज करून परत एकदा तसेच चालायचे
विसावा घेत वळणावळणावर परत फिरून मागे पाहायचे
दुख नसावे मनात सुटल्या क्षणाचे पैलतीर गाटताना
चलता चलता असाच एक दिवस अनंतात विरायचे
..................गजानन माने