Search This Blog

Monday, January 23, 2012

चिल्लर ...!!


Sunday, January 15, 2012

कविता


शब्दाला अलगत असे शब्द भिडले की, झाली कविता.

दुखी दिनिताला पाहून पाझर फुटला की, झाली कविता.

ओसंडणार्या त्या शब्दातून अर्थ उमटला की, झाली कविता.

तुटल्या फुटल्या हृदयातून विरह सांडला की झाली कविता.

हृदयात भाळाळनार्या वेदनेला अर्थ दिला की, झाली कविता.

अचाट अश्या दुखी मनातून वणवा पेटला की,झाली कविता.

वणव्यातही त्या मायाळू ओलावा भेटला की , झाली कविता.

घेतल्या ज्ञानाचा उपयोग दिला जगाला की , झाली कविता.

ज्ञान का मिळवावे याचा अर्थ उमगला की, झाली कविता.

भुकेल्याच्या तोंडी घासातील घास भरवला की, झाली कविता.

आपले दुख बाजूला सारून आनंद वाटला की, झाली कविता.

उसळणारा मनातील क्रोध आपल्या सावरला की, झाली कविता.

लेकरने जन्मदात्यांच्या डोळ्यातील अश्रू टिपले की,झाली कविता.

सात्विक यशाच्या पाठीवर मायेची थाप पडली की, झाली कविता.

ठणठणत्या जखमेवर प्रेमाची फुंकर घातली की, झाली कविता.

जीवन हें जगण्याचा खरा अर्थ समजला की, झाली कविता.

अशा नठेवता कोणतीच मागे जगाचा निरोप घेतला की, झाली कविता.

@गजानन माने.

Tuesday, January 10, 2012

आयुष्याच्या सरत शेवटी ....!!!


शोध संपला अता इवल्याशा मनाचा

सापडले त्याने समाधान झालेच नाही.

असवे त्या डोळ्यातील सुकली तरी आता

मनाला शेवटापर्यंत शांत बसवलेच नाही.

खूप काही कमावले तसे काही गमावले.

मन कुटे अन कधी समाधान पावलेच नाही.

मन हि जसे मोकळे तसे हातही मोकळेच

आत्म्याला कुटे विसावावे असे वाटलेच नाही.

परत त्याचा खाईत पडतोय मी आता

परत पदरी निराश्या आणि फक्त निराश्याच.

@गजानन माने.