Search This Blog

Wednesday, November 30, 2011

नात्यातील नेता

Saturday, November 26, 2011

थेट अगदी मनातून .....!!!


आयुषच्या गणिताचे उत्तर काही असले तरी
अन्तर कधीच आपसात वाढू नये.
मतभेद होतीलही आपसात म्हणून काही
मनामनात दुरावा कधीच घडू नये.
@गजानन माने

बाकी जरी शून्य आली तरी
त्या शून्यात मी तुलाच शोधीन.
येणार्या शून्य बाकीतून तेंव्हा
मलाच त्यातून मी वजा करीन.
@गजानन माने.
मला पडल्येला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
तुला तसे अगोदरच ठाऊक आसते.
परतून ऐकण्या उत्तर तोंडून तुझ्या
मन माझे अगदीच खूपच भाऊक आसते .
@गजानन माने.
प्रश्नालाही अलगद प्रश्न पडावा
अशीच काही माणसे भेटतात .
किती नशीब समजावे अपुले तेंव्हा
जेंव्हा त्यांचे हात आपुल्या हातात असतात.
@गजानन माने

तुझ्यापाशी कोणत्याही माझ्या प्रश्नांची
उत्तरे सहज अगदी अलगत सुटतात.
आजवरी कुटे होतीस तु
हिच कोडी माझ्या समोर पडतात...!!
@गजानन माने.
सुकलेल्या त्या फुलातून
गंध माझ्या आठवणीचा दरवळेल
येता आठवण माझी तुला
तीच अलगत केसांना कुरवळेल
@गजानन माने.
शब्दांनीच खूप छळंलय मला आजवर
तु आणखी मला आता छळंउ नकोस
दुखी सागरातच डुंबतोय मी आजवर
अजून दुखला माझ्याकडे वळऊ नकोस.
@गजानन माने.

डोळ्यांची भाषा अशी खूपच भारी आसते
वाचण्याची हि रीतच येथे न्यारी आसते.
वाचताना येथे मनाला थोडे आवरावे लागते
ती वाचण्यासाठी मात्र हृदयात उतरावे लागते.
@गजानन माने.

शब्दच ते तुझे माझे असे शस्त्रापरी
जशे त्यांना फिरवू तसे फिरतील ते
ओशाळातील भावना जेंव्हा आपुल्या
मग अलगद कुशीत तुझ्या विरतील ते.
@गजानन माने.

खरच तुला विसरने सखे आता
मलातरी तरी केवळ शक्य नाही
अवराने ओघळनारी असवे डोळ्यातील
माझ्यातरी आता आवाक्यात नाही.
@गजानन माने.

आभास हा माझ्या अस्तित्वाचा
तुज्यासाठीच तर तो जपलाय मी
फुल बनण्यासाठी कळीतुन आजवर
खुपच वादळवारा सोसलाय मी.
@गजानन माने.
कर्तव्याचे ओझे पेलत पेलत
अस्तित्व स्वताचे साधायचे
न-टाळता कधीच कर्तव्य आपले
मनोमनी प्रेमाचे महल बांधायचे
@गजानन माने.
मनानाने ठरवले आता खुप हसायचे
कारण नसतानाही कुणावरही रुसयाचे
ठरल्याप्रमाने मन जेंव्हा हसू लागले
हसने पहाता इतरच माज्यावर रुसू लागले.
@गजानन माने.
****************************************************************************************************************************************


Tuesday, November 8, 2011

आयुष्याचा प्रवास ...!!!


आयुष्याचा प्रवास तसा एकाकीच असतो
वाटेत भेटणारे नुसतेच वाटसरू असतात.
नातेलाऊन वाटसरू ते खोल मनात रुतून बसतात
कांही दीर्घकाळ तरी कांही क्षणासाठी
साथ सोबत करीत असले तरी
पैलतीर हें एकठ्यानेच गाठायची आसते.
पैलतीर गाठता-गाठता अनुभवरुपी
शिदोरी सारावांसाठी समान वाटायची आसते.
@गजानन माने.