Search This Blog

Wednesday, June 29, 2011

जाणे तुझेसोडून जाण्यासाठी मला तु कारणे शोधू नको
जाण्याचे कारण देखील तु मला कधी सांगू नको.
स्वताच निघून जाईन खूपदूर मी वाटेतून तुझ्या.
जागा तेवढी सांग जेथे आठवणी नसतील तुझ्या.

भावनांचा खेळ तुझा
मला कधीच कळला नाही.
अंतरीचा वारू आपला
कधीच असा जुळला नाही.

मीही असेच कधी कुणावरतरी एकदा निस्वार्थी प्रेम केले होते.
अंतरीचे सूर आमचे काय माहित तिच्यात कुठवर जुळले होते?
न जुळलेल्या त्या सुरांना माझ्या मनाची आंतरिक ओढ होती.
तुझे काही माहित नाही पण आठवण ती मला मात्र गोड होती .

Tuesday, June 14, 2011

विखुरलेले शब्द.


मनाचिंब भिजवण्या
पावसाची खरी सुरवात असते
पावसला नसली तरी
प्रेमाला एक अशी भाष्या असते .
--*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-
*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--

भिजलेल्या मनातूनच
शब्दांना खरे अंकुर फुटतात .
कधी दुखाचे तर कधी आनंदी
नउलगडणारे उमाळे दाटतात.
--*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--
अंकुर फुटतील का हृदयात
दबलेल्या माझ्या शब्दांना
शब्द सादरकरण्या आता
बरसावे लागेल डोळ्यांना.
--*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--
कोरड्या भावनामाझ्या
पाचोळ्याप्रमाणे विखुरल्या
आवर कशी घालू मी
वावटळ्याप्रमाणे त्या पसरल्या
--*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--
सुक्या भावनांच्या माझ्या
तारा अश्या तु छेडू नको
चडतोय तु रचलेले दुखाचे पहाड
मधेच मला अशी तु ओढू नको.
--*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--
अखेरचे ते शब्द तुझे कानी माझ्या
असेच आता विरून गेले.
आठवणीचे पाणी मनामध्ये
कधीच आता जिरून गेले.
--*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--*-*--
आठवणीचे डोळ्यातील अश्रू माझे
पुसण्याचा मला मोठा ताप आहे.
जिरणार्या त्या अश्रुना मात्र
आठवणीत झुर्ण्याचा शाप आहे.
----- गजानन माने

Saturday, June 11, 2011

मी
"चल निघते मी आता" शब्द तुझे कानी पडले .
त्यावेळी डोळे तुझे भरले होते.
डोळ्यात माझ्या पाणी आले नाही तरी
काळीज मात्र माझे चिरले होते !!
XX

येणारा पावसाळा आतामाझ्यासाठी खूपच वेगळा असेल.
येणारी आठवण तुझी पावसामध्ये वैशाखवणवा भासेल.
XX

दुखला देखील आता खूप दुख होऊ लागले आहे.
दुख स्वताहून आता माझे सांत्वन करू लागले आहे
दुखला कधीच असा घाबरलो नाही मी
म्हणून दुख स्वाहून मला सुख मिळावे
यासाठी ईश्वर चरणी लोळू लागले आहे
XX


काळीकुटरात्र होती पण त्यामध्ये मी माझी रस्ता चुकवली नाही
जखम होती सलत मनात पण मी ती कुणालाच दाखवली नाही
माहित होते मला कोणीच विचारणार नाही जगतोस तु कुणासाठी.
म्हणून मी सांत्वनासाठी कुणाकडेच कधीच मान झुकवली नाहीSaturday, June 4, 2011

पाऊस आणि प्रेमाचे समीकरण(1)
शाळा आणि कॉलेज प्रेमाचे माहेरघर असे मानले जाते आणि हें दोन्ही ज्यावेळी चालू होते त्याच वेळी पावसाची सुरवात असते त्यामुळे आणि त्यामुळेच नवीन भेटी गाठींची देखील याच वेळी सुरवात होते त्या प्रसंगी झालेली बातचीत , भेटीगाठी एकमेकला केलेली मदत ह्या आठवणी आयुष्य भरासाठी मनात घर करून जातात आणि ह्यावेळी कोणी प्रेमात पडत , कुणाला जिवाभावाची मैत्री मिळते तर कुणाची नुसती नजरा नजर होऊन त्या गोड आठवणी बनून आयुष्यभर सोबत करतात. हेच तर पाऊस आणि प्रेमाचे समीकरण असावे कदाचित ...

(2)
धर्तीची आणि पावसाची जिवाभावाची मैत्री असते त्यामुळे तप्त झालेल्या जमिनीला न्हावू घालण्यासाठी पावसाची हि सुरवात असते हा त्यांचा विरह इतका व्याकूळ करणारा असतो की आता जमिनीला भेटायचे आहे ह्या आनंदाने पाऊस देहभान विसरून गर्जना करीत जमिनीकडे धाव घेतो म्हणून पावसाळा सुरु होण्यापूर्वी आकाशात ढगांचे गडगडाटासह तांडव असते. विरहाने व्याकूळ जमीन आकाशाकडे आशेने अगोदरच टकलाऊन बसते. पाऊस बरसतो अगदी देहभान विसरून दोघे एकरूप होतात. धरती तृप्त होते आणि आपला आनंद मृदुगंध रूपाने सगळी सोडते त्याची प्रचीती म्हणून तर जमिनीमधून नवनवीन अंकुर उमलतात एका नवीन जीवनाची सुरवात होते काहींची काही काळासाठी तर काहींची वर्षानुवर्षांसाठी...!!