Search This Blog

Sunday, May 27, 2012

स्वप्नसुंदरी



Saturday, May 26, 2012

हें देवा मग हे जग सुन्दर कसे ...!!!!


एकीकडे सौंदर्याची खान आणि  जगाचा वा ...वा ...!! तर दूसरी कड़े किळसवानेरूप  तूच  बनवतोस. सौंदर्याकड़े पहावे की किळसवान्यारुपाकडे, तरी त्या पहाण्यात विसंगति आहेच ना रे ..!!  मग मला सांग हे जग सुन्दर कसे ......??? एकीकडे भयानक दुःखाचे पहाड़ अणि एकीकडे  आनंदी  महल ही विसंगति तूच निर्माण केलिस ना?? दुखी पहाड़ पण तूच बनावितोस अणि आनंदी महल देखिल तूच मग दुखी पहाड चढायचे  की आनंदी महालात बागडायचे ?? चढवणे आणि बागडवने   देखील तुझ्याच हातात, मनात नसताना ह्यापैकी एक करावेच लागते ना..!!  मग मला सांग हे जग सुन्दर कसे ..??? वादविवाद अडचणी  नसतात कुठे सगळी कडे त्या  असतातच हें मान्य. पण एकटा वाद करणार आणि त्याचा त्रास दुसर्याला का होतो ..?? त्या दुसर्याने त्याची चूक काही नसताना हें का सहन करायचे कितीवेळा आणि कुठवर याला कुठेतरी पूर्णविराम पाहिजेच ना . पण मला तो कुठेच दिसत नाही. दिसतो तो फक्त स्वल्पविराम म्हणजे एका अडचणीतून बाहेर पडलो की दुसरी स्वागतास तयारच आसते. या दुखाचे कुठवर स्वागत करायचे. आता नाही सहन होत रे हें सगळे ,  खुप होते मनाची घुसमट.   जगणे आता असह्य वाटते, दुखात खितपणारे जीवन हें कायमचे  असेल तर हें जगणे मग काय कामाचे . मी  फक्त खेळणे बनून राहायचे का तुझ्या खेळातील एक ज्याला कसलाच अधिकार नसतो आणि ते खेळणे गेले म्हणून काही खेळ थांबणार देखील नसतो. मग का राहावे त्या खेळण्याने त्या डावात त्याला डावात येण्याचा जसा अधिकार आहे तसा बाहेर जाण्याचा देखील अधिकार पाहिजेल ना मग. म्हणून  मी ते तुझ्या ह्या खेळला कंटाळून  संपवले तर मग ?? ते पाप कसे तूच  सांग आता ते पाप कसे ते..!!.. गजानन माने.