Search This Blog

Saturday, August 20, 2011

जाणे तुझे !!!


मला सांगा सखे एकटी असताना तु
माझी आठवण कधी काढशील का ?
एकांतात असताना अंधार्या खोलीत
माझ्यासाठी दोन अश्रू ढाळशील का ?





का बरे आलीस वाटेला माझ्या
असे मी एकटे एकटे चालताना.
एकटेपणाची भावना माझी
मनोमनी माझ्या मी तोलताना.

तु पाखरू झालीस तेंव्हा
तुझ्यासाठी मी झाड झालो
उडून गेलीस तेंव्हा मात्र
धगधगता पहाड झालो.

वाटते मला हि मनोमनी
तु आत्ता माझीच व्हावीस
तोडून सारी जाच-बंधने
धावत माझ्याकडे यावीस .

मलाही काही मर्यादा आहेत आता
वाटते न सांगता तु समजून घेशील
नकोस घेऊ असा संशय माझ्यावर
आधार मला प्रेमाचा तूच तर देशील
येईल आठवण माझी तेंव्हा
पाहण्यास मला तरशील तु .
आठवणीच्या उमाळ्यांना
सांगा बरे कसे सावरशील तु
?
विरतील अश्रू सरतील आठवणी
मनाला तुझ्या तु सांभाळ ग
जीव रुतालय तुझ्यात माझा
जसे कोरडे पडलेले आभाळ ग॥!!

.................गजानन माने

Sunday, August 14, 2011

मित्र


@@@@मित्र@@@@@@@@@
अपुले मित्र , मैत्रिणी हे असेच असतात .
पाखरांसारखे कुठून तरी उड़त उड़त येतात..!!!
हृदयाच्या फांदीवर अलगद विसावतात
मनामध्ये हळव्या प्रेमाचे घरटे बनवतात ...!!!
सोबत सुख- दुखाची गाणी गुनगुनतात
अणि एक दिवस मैत्रीच्या धग्याचे एक
अविस्मरनीय घरट मनामधे ठेवून
हळूच नकळतपणे उडूनहीं जातात.
काही कायमचे, तर काही काही क्षणापुरते.
जे कायमचे उडून जातात त्यांचे
चेहरे मात्र काळानुरूप विरून जातात
चेहरे काळामध्ये विसरले तरी ते ...!!!
कटू-गोड आठवणीचे क्षण मात्र
हृदयात खोलवर कोरलेले असतात ...!!!
आठवता त्या आठवणी मात्र ....
डोळ्यातून अश्रुंचे बांध फुटतात ...!!!

Saturday, August 13, 2011

आज मला मुक्ती पाहिजे


मज आज आताच ह्याक्षणी ..!!
ह्या भकासतेतून मुक्ती पाहिजे.
हृदयी भळाळंणार्या जीर्ण जखमांना
फुंकर नघेण्याची आसक्ती पाहिजे.
जखमेतून वाहणारया रक्ताला
जागीच गोठण्याची सक्ती पाहिजे.
ठणका घालणाऱ्या वेदनेतून
आज मला विरक्ती पाहिजे.
गालावरून घसरत्या आसवांना
थोपवण्याची आता गरज आहे.
तुटता बंध , मिटता डोळे
कोरड्या पडतील भावना माझ्या
पुसलेल्या आठवणीना त्या
त्यांना विरक्तीची ओढ पाहिजे
ह्या बेफाम बेमालूम जंजाळातून
आज मला मुक्ती पाहिजे
...........................................गजानन माने