Search This Blog

Thursday, April 28, 2011

वार्याची झुळूक




येणारी वार्याची प्रत्येक झुळूक मी
तुझ्यासाठीच वाहिली होती.
भविष्याची अनेक सुंदर स्वप्ने मी
तुझ्या वचनाने पहिली होती.


Wednesday, April 20, 2011

जीव दंगला गुंगला रंगला असा..

अशी काही गाणी निर्माण होतात की जी ऐकल्यानंतर ती थेट काळजाला जाऊन भिडतात असेच हें एक थेट काळजाला हात घालणार मराठी गाण "जीव दंगला गुंगला रंगला असा" मला खूप भावले आहे तुम्हालाही नक्कीच भावेल ..............

जीव दंगला गुंगला रंगला असा..
पीरमाची आस तू ..
जीव लागला लाभला..
ध्यास ह्यो तुझा..
गहिवरला श्वास तू..

पैलतीरा नेशील..
साथ मला देशील..
काळीज माझं तू ..

सुख भरतीला आलं..
नभ धरतीला आलं..
पुनवचा चांद तू..

जीव दंगला गुंगला रंगला असा..
पीरमाची आस तू ..
जीव लागला लाभला..
ध्यास ह्यो तुझा..
गहिवरला श्वास तू..

चांद सुगंधा येईल..
रात उसासा देईल ..
सारी धरती तुझी..
रुजाव्याची माती तू..

खुलं आभाळ ढगाळ..
त्याला रुढीचा ईटाळ..
माझ्या लाख सजणा..
हि काकणाची तोड माळ तू..

खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन..
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचं गोंदण..

जीव दंगला गुंगला रंगला असा..
पीरमाची आस तू ..
जीव लागला लाभला..
ध्यास ह्यो तुझा..
गहिवरला श्वास तू..
.....................चित्रपट :- जोगवा

Saturday, April 16, 2011

सोबती


असेल सोबत कुणीतरी चालायला
तरच चालण्यात त्या अर्थ असेल
सोबतीमुळे त्याच्या वाळवंटात देखील
नंदवन असल्याचे भासेल


शब्द असेच सुचलेत मला तु निघून गेल्यावर
मनातील मनोरे असेच ढासळलेत आता.
मात्र मला झोपेतून जाग आल्यावर ..

झोपेचे सोंग घेऊन कुठवर जगायचे जागे तरी व्हावे लागणार ...
करपनारे झाड मी कुणाच्या सावलीची आता आस शोधणार

.......................................गजानन, [एक मजेशीर जग]

Thursday, April 7, 2011

तुझी साथ

सोडायचा होता हात असा मधेच तर
पहिल्यांदा सावरायचा तरी कश्याला
जाणारा तोल माझा सोबतीशिवाय तुझ्या
तु असा पहिला आवरायचा तरी कश्याला

सोडताना हात तुझा त्याक्षणी छाती माझी धडधडत होती.
शेवटचीच भेट होती अपुली अशी जाणीव मला होत होती.

नियमित वाहणारी मंजुळ नदी तु
अचानक असे रौद्ररूप का घ्यावेस.
कवेत तुझ्या सगळ्या आठवणी
घेऊन सागरास असे का मिळावेस.
दिलेली वचने तुझी परत तुझी तुला ती घेऊन जा
ओठांवर हसू माझ्या पहिल्यासारखेच ठेऊन जा

प्रेम केल मी तुझ्यावर असेच फसण्यासाठी
आयुष्यात पुन्हा कधीही न हसण्यासाठी
........................................गजानन, [एक मजेशीर जग].