Search This Blog

Sunday, January 2, 2011

माझ्याबद्दलही थोडे................!

रंगमंच्यावर उभे राहण्यापूर्वी ................!! मी गजानन, गजानन माने. पण ..! घरातील सार्वजन मला गज्याच म्हणतात कारण घरातील माझ्या सर्व भांवडत मी लहान त्यामुळे आणि माझ्या जवळच्या मित्रांचा मी महाराज. शेजार्यांचा गजर्या, माझी आई मला कधी प्रेमाने गजू तर वडील गजबर म्हणतात आणि वाहिनी गजाभाऊ . आम्ही ऐकून चार भावंडे आणि आई वडील आणि थोरल्या भावाची बायको म्हणजे आमची वाहिनी व त्यांची दोन मुले असे मिळून नऊ जणांचे आमचे कुटुंब थोरला भाऊ व वहिनी दोघेही प्राथमिक शिक्षक त्यामुळे ते हळदी येथेच स्थाईक बाकी सर्वजन आम्ही आमच्या म्हणजे अप्पाची वाडी येथेच राहतो. तसा लहानपनि मी खूपच नटखट आणि खूप खोड्या करणारा ,खोडकर, तापट स्वभावाचा भांडखोर आणि नेहमी खाहीतरी कारामिती करणारा, म्हणून मी आमच्या सगळ्या गल्लीत नव्हे तर अख्या गावात प्रसिद्ध पण ... ! काळ वेळ आणि जीवनात जे जे काही चढउतार पहिले आणि वाट्याला जेजे अनुभव आले त्यामुळे जे काही माझ्या जीवनात बद्दल घडत गेले तसतसा बराच फरक पडत गेला . तापट असणारा स्वभाव खूपच हळवा झाला खुप म्हणजे खूप ह्या हळव्या स्वभाव पोटीच एका साध्या प्रसंगाने मी कायमचा शाकाहारी झालो . काही काही शुल्लक कारणामुळे आणि माझ्या भवती घडणाऱ्या काही प्रसंगामुळे मी असवस्थ होऊ लागलो. साध्या साध्या गोष्टीवर खूप विचार करू लागलो कुठे तरी काहीतरी वाईट प्रसंग घडल्याचे माझ्या नजरेस पडले की मी खूपच असवस्थ होतो मनात एकप्रकारची हुरहूर आणि अस्वस्थता निर्माण होते त्यामुळेच माझ्या व्यक्तीमहत्वात खूपच बद्दल झाला आणि होतो आहे. आमच्या कुटुंबाबद्दल सांगायचे झाले तर आता खूप नाही पण पुर्विपेक्ष्या आम्ही खूपच बर्या पैकी आम्ही समाधानी आहोत. आतापर्यंत झालेला माझा खडतर प्रवास मी तुमच्या समोर जसाचा तसा मांडीत आहे कोणत्याही स्वार्थपोटी नाही तर फक्त मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी हि माझी छोटीशी धडपड.
मी इथे माझ्या आयुष्यात ज्या ज्या सुखद आणि दुखद गोष्टी घडल्या. आणि मी ज्या ज्या चांगल्या वाईट अनुभवांना सामोरे गेलो. त्या तश्या आणि तश्याच येथे मी मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.येथे मी ज्या गोष्ठी मांडत आहे त्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही. मी जे भोगले सोसले, तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक, दुखे आणि आडीअडचणी अनेकांच्या वाट्याला आली असतीलहि . आणि हा विचार घेऊन मी माझ्या अवती भवती पाहतो आणि वाटते अरेरे हें तर काहीच नाही जगात दुख फार आहे आणि त्यातील कांही अंशच आपल्या वाट्याला आहे त्यात काय एवढे आणि मी काही त्याला अपवाद नाही मग मी माझे दुख उगाळून परत परत घडून गेलेली आणि पूर्णपणे भरून आलेल्या जखमेची खपली का बरे काढावी, फक्त माझ्या पूर्वायुष्यात ज्या काही घटना घडल्या त्यामुळे मनाला थोडी अवस्थता जाणवते व माझ्या मनात कांही अंशी अस्वस्थता येते आणि मन भरून येते ते हलके करण्यासाठी व ती अस्वस्थता कमी करण्यासाठी मन हलके होण्यासाठी व मनात असणारी असवस्थता कमी व्हावी म्हणूनच हा खटाटोप , आणि माझे हें लेखन इतरांना दाखऊन त्यांची सहनभूती मिळावी त्यांनी कोणतातरी आधार आपणास द्यावा हा माझा मुळीच उदेश नाही आणि इतरांनी ती द्यावी हि माझी मुळीच इच्छा नाही . मी काही वेगळे केले आणि इथपर्यंतचा प्रवास केला अस सांगण्याचा देखील माझा उदेश नाही. आणि मला अशेही वाटते की जीवन हे सुखदुखाचे जंजाळ आहे हें थोडेच आपल्याच वाट्याला येते ते तर प्रत्येकालाच भोगावे लागते. आणि हो जर आपल्या वाट्याला फक्त सुखाच आले तर त्या आयत्या सुखाची किमत ती काय ? आणि नुसते दुखच आले तर जीवनातील रसाच निघून जाईल पण तसे होत नाही प्रत्येकाच्या वाट्याला हे दोन्हीही कमी अधिक प्रमाणात येत असतात आणि त्यालाच जीवन म्हणतात आणि आपण तरी त्याला कसे अपवाद असू . असो मी इथे फक्त माझ्या मनात जे साचलय आणि रचलंय ते इथ तुमच्या समोर जसेच्या तसे मांडत आहे काही ठिकाणी भावनिक झालर असेलीही हें मी मान्य करतो पण अतिशयोक्ती मात्र अजिबात नाही मी माझ मन तुमच्या समोर रीत करीत असतातन हा माझा प्रयत्न किती यशस्वी होईल हे मला माहित नाही. फक्त माझ्या मनात जी अस्वस्थता आहे ती कमी होईल आणि ती कमी करण्याचा माझ्या येथे प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो मी येथे करतोय. तो तुम्हाल किती प्रमाणात भावतो ते तुमीच ठरवा -- गजानन माने.

No comments:

Post a Comment