Search This Blog

Thursday, March 31, 2011

मायमराठी

मी मराठीच आहे आणि मराठीच रहणार.
मराठी मायभूचे गीत मी असेच गाणार.

मायमराठी तुच आहेस माझी प्रिय मातृभाषा.
जगावर राज्य करण्याची मिळते मज अभिलाषा.

जगात आहे माय मराठी खूप मान तुला
तुझा विकास करण्याचे दे वरदान मला.

वरदहस्त मझ्या माथी तुझा असाच राहूदे
रोमरोम माझा क्षणोक्षणी तुझे गीत गाऊदे.

गोडवा तुझा असाच युगानुयुगे अजरामर राहू दे
मराठी माझी जगातील एक मुख्य भाषा होऊ दे

विकास तुझा केला ज्या लहान थोर संत-साहित्यकांनी
सदैव नतमस्तक होतो मी त्यांच्या पवित्र पावन चरणी.

अनंत उपकारआम्हावर त्या साहित्यिक महात्म्यांचे.
केलेत प्रयत्न त्यांनी अवघी अवनी तुझ्या नावे व्यापाण्याचे.

पवित्र पावन धूळ त्यांच्या चरणाची माझ्या माथी नेहमीच पडूदे
प्रगतीच्या माळेतीलमनी तुझ्या एकतरी माझ्या हातून चडूदे.
हेच मागणे मागतो तुझ्या चरणी तुच आहे उभ्या महाराष्ट्राची जननी

अशीही आमची मातृभाषा मायमराठी किती गावी तिची थोरवी
विकासाची गुढी तुझ्या अशीच युगानुयुगे आकाशी भिडावी.
........................ गजानन माने

No comments:

Post a Comment